जळगाव (प्रतिनिधी) : येथील मेहरूण परिसरातील विचार वारसा फाउंडेशनतर्फे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त दहावी व बारावी उत्तीर्ण १३० विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करीत मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुरेश भोळे, करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, असोदा येथील सामाजिक कार्यकर्ते रवी देशमुख, वासुदेव सोनवणे विलाससिंह पाटील, बी.एच. खंडाळकर, उमेश सोनवणे, संतोष पाटील, नरेंद्र राजपूत, भूषण लाडवंजारी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
दहावी व बारावी परीक्षेत उत्तम टक्केवारीने उत्तीर्ण झालेल्या २० विद्यार्थ्यांचा सुरुवातीला जल्लोषात गौरव करण्यात आला. त्यानंतर उर्वरित ११० विद्यार्थ्यांना देखील मान्यवरांनी कौतुकाची थाप देऊन गौरविले व आगामी शैक्षणिक कारकिर्दीसाठी सदिच्छा दिल्या.
आमदार सुरेश भोळे, भूषण लाडवंजारी, संतोष पाटील, सुरेश राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन निलेश सपकाळे यांनी केले. यशस्वीतेसाठी विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, प्रकल्प प्रमुख आशिष राजपूत, अभिजीत राजपूत, ऋषी राजपूत, मयूर डांगे, अमोल ढाकणे, ऋषिकेश तोमर, संकेत मस्कर, गौरव डांगे, चेतन राजपूत, लोकेश निकम, मुकेश तायडे, ओम मांडोळे, राहुल देशमुख आदींनी परिश्रम घेतले.