धुळे ;- तालुक्यातील लामकानी गावा जवळील वन विभाग परिक्षेत्रातील 20 ते 25 हेक्टर जमीन वर वृक्षलागवड करण्यात आली आहे.तेथील कुरण परिसरात आज अचानकपणे सायंकाळच्या वेळी अचानक पणे आग लागली.आगीने लवकरच रौद्ररूप धारण केले.तेथील काही ग्रामस्थांनी आग लागली आहे पाहताच हातात हिरवा पाला घेऊन कोरड्या चाऱ्याला लागलेल्या आगीवर मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तो तोडका ठरला.आगी बाबत मनपा अग्निशामक दलाच्या कार्यालयात माहिती देण्यात आली.माहिती मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी शहरात लॉक डाऊन दरम्यान लावण्यात आलेले अडथळे पार करत तातडीने काही मिनिटात घटना स्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फ़ायरमन सचिन करनकाळ ,किरण साळवी, विलास बडके यांनी परिश्रम घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.या आगीत वन परिसरातील ब-याच हेक्टर भागातील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट झाली आहे.
आग नेमकी कशामुळे लागली होती याचे नेमके कारण कळू शकले नाही.
या अगोदरही मागली वर्षी याच पद्धतीने लामकानी वन परिसरात आग लागून नुकसान झाले होते.लामकानी गावात या आगी बाबत ग्रामस्थात उलटसुलट चर्चा सुरू होती.आगी बाबत पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रव 3 व 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.








