जळगाव (प्रतिनिधी ) – जळगांव शहर येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिटणीस योगेश साळी यांच्या मार्फत आज रोजी शाळेला दोन मोठे तिरंगा ध्वज व शालेय विद्यार्थी यांना ५० तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख पाहुणेम्हणून शाळेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल , विद्या वर्धिनी अध्यक्ष मंगला जुनाखे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिटणीस योगेश साळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष नरेंद्र शिंदे सामाजिक कार्यकर्ते विशाल वाघ व शाळेचे शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.