समाजातील ३० विद्यार्थ्यांना गौरविले
जळगाव (प्रतिनिधी) :- वासुदेव समाज सेवा संघ आणि वासुदेव जोशी समाज बहुद्देशीय सेवा संस्था जळगाव. च्यावतीने गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा रविवार दि. १४,जुन रोजी श्री गुरु गोरक्षनाथ मंदिर, वासुदेव जोशी कॉलोनी, जळगाव येथे इयत्ता १० वी १२ वीतील ऊत्तीर्ण असे एकूण ३० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव वेडू जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक आनंदा फकिरा जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि समाजातील आदर्श माजी शिक्षिका रंजना भोजने यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा, योग्य निर्णय जीवनात घ्यावा असे सांगितले तसेच कार्यक्रमाला जोशी समाज बहुद्देशीय सेवा संस्थाचे संचालक अनंत जोशी यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ समाजसेवक रविंद्र रणदिवे, अनिल पवार, अनिल कानडे, पांडुरंग जोशी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाला समस्त वासुदेव जोशी गोंधळी समाजा चे पंच थोर मंडळी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद जोशी यांनी केले तसेच कार्यक्रमाची प्रस्ताविक अनिल पवार यांनी केली. कार्यक्रमाचे आभार अनंत प्रमोद जोशी यांनी मानले. सदर कार्यक्रमास विजय जोशी,अनिल जाधव,राजेश जोशी, अनिल दोरकर, रमेश विधाते,राकेश भोजने,भानुदास जोशी,अनिल लागवनकर,दीपक जोशी,हिरामण जोशी, विशाल जोशी, सुहास जोशी, विनोद भोपे, सागर जोशी, रवींद्र जोशी,निखिल जोशी, सचिन कानडे, गोपी बाबा यांनी परिश्रम घेतले.