रावेर तालुक्यात वाघाडी येथे व्यसनमुक्ती संस्कार शिबिर उत्साहात
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : वाघाडी ता. रावेर येथे आदिवासी कोळी महासंघ रावेर तालुका व महाएकता फाउंडेशन, तांदळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य व्यसनमुक्ती संस्कार शिबिर घेण्यात आले. समोरापात प्रमुख अतिथी पदावरून ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यसनमुक्त झालेल्या युवक व पुरुषांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील हे होते. प्रास्ताविक योगेश्वर कोळी यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत मनोहर कोळी, शिवा कोळी आदी मान्यवरांनी केले. याप्रसंगी शिवाजीराव पाटील, रावेर तालुका संजय निराधार गांधी योजना समितीचे अध्यक्ष दिनेश उर्फ छोटू पाटील, शिक्षक राहुल पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे , ब्रिजलाल कोळी यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी सभापती कविता हरीलाल कोळी, दुर्गादास पाटील, प्रमोद चौधरी सिंगत, डॉ. तेजस्वी बिडवे, साधना योगेश्वर कोळी,सखाराम बांडे राजुर ,माधव गवळे फैजपूर मानेभाऊ अकोले, शशांक पाटील ,संजय कांडेलकर सिद्धार्थ तायडे ,प्रशांत गाढे,गंभीर उन्हाळे, निरंजन तायडे, रूपालीताई कोळी ,आशाताई सपकाळे, गुणवंत पाटील, विजय अवसरमल, अनिल आसेकर,चंद्रकांत कोळी, विनायक जहूरे, संकेत पाटील, दत्तू कांडले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा कोळी, गोपाळ कोळी, उमेश कोळी, संदीप महाले, मच्छिंद्र कोळी, विनोद कोळी, भगवान कोळी, रवींद्र कोळी आदी बांधवांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अकिल शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोहर कोळी यांनी मानले.
००००००००००००००००००