जळगाव — गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव येथे वार्षिक क्रीड़ा महोत्सवचा समारोप नुकताच करण्यात आला.
गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव येथे दोन दिवस वार्षिक क्रीड़ा महोत्सव साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रमुख पाहुणे डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या वेळी क्रीड़ा संचालक प्रा. डॉ आसिफ खान उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांघिक खेळाचे महत्व पटवून उत्साह वाढविला. क्रीड़ा महोत्सवात मध्ये क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ व कबड्डी या खेळाचा समावेश करण्यात आला होता.
स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत
क्रिकेट पुरुष विजयी संघ- थंडर स्ट्राईकर्स उपविजयी संघ- सी ओ ब्लास्टर्स क्रिकेट महिला विजयी संघ- प्रथम वर्ष डिग्री उपविजयी संघ- डिग्री गर्ल्स फुटबॉल पुरुष विजयी संघ – डिप्लोमा वॉरियर्स उपविजयी संघ – डिग्री स्पार्टन्स कबड्डी पुरुष विजयी संघ- मैकेनिकल स्पार्टन्स उपविजयी संघ- डिप्लोमा वॉरियर्स बुद्धिबळ पुरुष प्रथम- मोहम्मद तल्हा जावेद इक़बाल द्वितीय- रोहीत दिलवर तड़वी तृतीय- तबरेज़ अहमद आसिफ पिंजारीबुद्धिबळ महिला प्रथम- मेघा प्रवीण सोनवणे द्वितीय- सविता ईश्वर सोनवणे तृतीय- खुशी योगेश पाटील गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेस्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. आसिफ खान यांच्या मार्गदर्शना खाली ज़ैनुद्दीन देशमुख, मयूर कोळी, नेहा बारी, साद शेख यांनी परिश्रम केले.