शिंदे गटाचा नेता पोलिसांच्या ताब्यात, तर मुलासह दोघांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था ) ;- मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर चालकानं घटनास्थळावरुन पलायनकेले . मात्र पोलिसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अपघात झाला त्यावेळी राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा गाडी चालवत होता. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकटवर्तीय देखील मानले जातात. पोलिसांनी आरोपीच्या मिहीर शहा याला देखील अटक केली आहे.मिहीर शहा आणि चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील वरळीतअसलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते.अनियंत्रित कार आपल्या दिशेने येत आहे हे दिसताच सतर्क झालेल्या पतीने कारच्या बोनेटवर उडी घेतली. मात्र महिलेला तसं शक्य झालं नाही. भरधाव कारने दोघांना धडक देत काही अंतरावर फरफटत नेलं. मात्र पती कारच्या बोनेटवर असल्याने फार दुखापत झाली नाही.