पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती, उपबाजार वरखेडी येथील गुरांच्या बाजारातील गुरांचे उन्हापासून बचाव होण्यासाठी जागेत बदल व संपूर्ण परिसर साफसफाई करून सज्ज. सभापती – गणेश भिमराव पाटील
पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पदावर सभापती गणेश भिमराव पाटील व सर्व संचालक मंडळ विराजमान झाल्यापासून त्यांनी शेतकरी व व्यापारी हितासाठी बरचशे निर्णय घेत पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती तसेच उपबाजार समिती मध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.आत्ता नुकतेच वरखेडी येथील गुरांच्या बाजारात म्हशींचा बाजार उन्हात भर असल्याने गाभण म्हशी तसेच दुभत्या म्हशींचा गर्भपात होणे आजारी पडणे हे प्रकार घडत होते.
म्हणून आता म्हशींचा, शेळ्यांचा तसेच इतर गुरे ढोरांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना सुरु असून वरखेडी येथील संपूर्ण मार्केट यार्डात साफसफाईचे काम हाती घेतलेले आहे. तसेच वरखेडी मार्केट यार्डात मागील बाजूस असलेल्या झाडांखाली भरणाऱ्या शेळी बाजाराच्या जागेवर म्हैस बाजार व म्हैस बाजाराच्या जागेवर शेळी बाजार भरवण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून शेळ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी पत्राचे शेड उभारण्यात आलेले आहेत. म्हणून येत्या २६ ऑक्टोबर २०२३ रोजी गुरुवार पासून वरखेडी गुरांच्या बाजारात शेळी बाजाराच्या जागेवर म्हैस बाजार व म्हैस बाजाराच्या जागेवर शेळी बाजार भरणार असल्याने पशुधन व्यापारी व पशुधन पालकांनी हा बदल लक्षात घेऊन आपली जनावरे विक्रीसाठी उभी करावीत असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील व संचालक मंडळाने केले आहे.
यावेळी उपसभापती पी. ए. पाटील व संचालक सुनिल युवराज पाटील, प्रकाश शिवराम तांबे, विजय कडू पाटील, राहुल रामराव पाटील आदी संचालकांसह कर्मचारी व गुरे व्यापारी उपस्थित होते.