रोटरी क्लब, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यसनांचे प्रमाण हे खूप वाढत चाललेले आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. व्यसनांचे वाढते प्रमाण कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी रोटरी क्लब आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे आषाढी एकादशीनिमित्त बुधवार दि. १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ‘व्यसनमुक्तीची वारी आली आपल्या दारी’ याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही वारी व्यसनमुक्तीचा संदेश देणार आहे. दरवर्षी ही वारी काढली जाते. सकाळी ९ वाजता वारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून महात्मा गांधी उद्यान पर्यंत निघणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. जळगावकर नागरिकांनी या व्यसनमुक्ती वारीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संचालक नितीन विसपुते यांनी केले आहे.