जळगाव (प्रतिनधी ) ;- शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना जळगाव जिल्हा व जळगाव महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील तुकारामवाडी व शाहूनगर या दोन ठिकाणी हिमोग्लोबीन तपासणी व हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी विनामुल्य औषध वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान गोलाणी मार्केट येथील शिवसेना कार्यालय येथे वर्धापन दिवसानिमित्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व मातोश्री स्व. मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
तुकारामवाडी येथील शिबीराचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितिन लढ्ढा व महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर शाहूनगर येथील शिबीराचे उद्घाटन पालक मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन व महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. शाहूनगर येथे 312 व तुकाराम वाडी येथे 258 महिलांनी शिबीरात सहभाग घेऊन हिमोग्लोबीन तपासून घेतले.
यावेळी शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, माजी महापौर नितिन लढ्ढा, महानगर प्रमुख शरद तायडे, विधानसभा क्षेत्र समन्वयक राधेशाम कोगटा, नगरसेवक व गटनेते अनंत जोशी, प्रशांत नाईक, निता सोनवणे, शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, विवेक सोनवणे, महिला आघाडी महानगरप्रमूख शोभा चौधरी, निलू इंगळे, विमल वाणी, चंद्रकांत भापसे, युवासेनेचे महानगरप्रमुख विशाल वाणी, स्वप्निल परदेशी, पियुष गांधी, जय मेहता, अंकीत कासार, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर अल्पसंख्यांक आघाडीचे जाकीर पठाण, उपमहानगरप्रमुख जितू साळूंखे, मधूर झंवर, कामगार सेनेचे ईश्वर राजपूत, प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, विश्वनाथ पाटील, समन्वयक अंकूश कोळी, संतोष पाटील, वाहतुक सेनेचे जब्बार पटेल, श्रीकांत आगळे, इकबाल शेख, रईस शेख उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी अर्जून भारूळे, प्रितम शिंदे, दिपक पवार, नितिन चौधरी, मनोज मानकुंबारे, राजेश वारके, विवेक महाजन, राजेश काळे, नेमिचंद येवले, विकी काळे, सचिन पाटील, राहूल चव्हाण, गोकूळ बारी, शोएब खाटीक, अजय ठाकूर, राहूल पावसे, योगेश कोळी, अक्षय सोनवणे, मंदार सोनवणे आकाश साळुंखे. शिबीराला माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे अनमोल सहकार्य लाभले, रक्तपेढीचे डॉ. श्रीकांत मुंडळे व जागृती लोहार यांनी तपासणी केली. सुत्र संचालन विराज कावडीया यांनी केले.
शिवसेना जळगाव महानगरच्या कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देवून जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.