वरणगाव (प्रतिनिधी) – वरणगाव शहरातील समांतर महार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची पुन्हा नागपुरात नगराध्यक्ष सुनील काळें यांनी शिष्टमंडळासोबत भेट घेत सविस्तर प्रस्ताव सादर केला.

वरणगाव बायपासने संपूर्ण वाहतूक शहराबाहेरून जात असल्याने वरणगाव शहराचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र वरणगावकरांचे अस्तित्व संपू देणार नाही ही खूणगाठ मनाशी बांधून वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी १४ व १५ जुलै रोजी राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली व निवेदन दिले होते. त्यावेळी ना. गडकरी यांनी मी नागपुरात असतांना संपूर्ण प्रस्ताव घेऊन या तिथे सर्व अधिकारी असतील तिथे निर्णय घेउ असे सांगितले होते. त्याअनुषंगाने आज नागपूरमध्ये पुन्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट डॉ. राजेंद्र फडके यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनिल माळी, किरणं धुंदे यांनी भेट घेत विस्तृत प्रस्तावा दिला. या प्रस्तावात फुलागाव फाटा बसस्थानक चौक ते साईबाबा मंदिरापर्यंत समांतर महामार्ग बनविणे.







