भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी येथे राहत्या घरात प्रौढाने गळफास घेतल्याची घटना सोमवार सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आयुध निर्माणी वरणगाव येथील क्वॉर्टर नंबर १३० टाईप टू मधिल रहिवासी सोपबहादुर धनबहादुर गोरखा (थापा, वय ५२) याने राहत्या घराच्या दरवाजाच्या कडीला कंबरेच्या पट्टटयाच्या साह्यायाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत प्रथमेस सोपबहादुर गोरखा (वय १९) याचे खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरणगाव पो.स्टे.चे सपोनि जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यासिन सत्तार पिंजारी करीत आहे. गळफास घेतल्याचे कारण समजू शकले नाही. मयताच्या पश्चात दोन मुले आहेत.