चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे कार्यवाही
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील रांजणगाव येथील रहिवाशी पुष्कर चव्हाण यांच्या शेतात काम करणाऱ्या काशिराम पावरा यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या चार वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते. या घटनेनतंर वनविभागाने बिबटला पकडण्यासाठी शेतात बिबट्याला पकडण्यासाठी ६ पिंजरे आणि २८ ट्रॅप कॅमेरे लावले होते. पुष्कर चव्हाण यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात एक नर व एक मादी अडकला आहे.
पकडलेल्या बिबट्यांना वनविभागाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतले. त्याना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दोन बिबटे पकडले गेल्याने या भागातील बिबट्यांची दहशत काहीशी कमी झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात बिबट्यांची मोजदाद होऊन त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.