पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वंजारी खु, येथील जि प शाळेच्या ३ खोल्यांचे आज भूमिपूजन करण्यात आले.
गृप ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे बांधकाम जळगाव जि.प.सदस्या रत्नाताई पाटील यांच्या निधीतून करण्यात येत आहे. भुमिपुजन रत्ना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक पाटील ( पं.स. उपसभापती, पारोळा )होते प्रमुख अतिथी रोहिदास पाटील होते यावेळी सरपंच जितेंद्र पाटील, उपसरपंच वनमाला पवार, राजपूत करणी सेनेचे बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील अजय ठाकरे , माजी सरपंच जितेंद्र पाटील, पोलिस पाटील मनोज पाटील, धनसिंग पाटील, पांडुरंग पाटील, रमेश चौधरी, संजय पाटील, बापू पाटील, प्रकाश पाटील, नाना पाटील, भिमसिंग पाटील, राजू पाटील, ग्रामसेवक प्रवीण अमृतकर , शिक्षक अनिल चौधरी, किरण पाटील , दीपक पाटील, प्रवीण पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी रोहिदास पाटील यांनी शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता जोड धंदा करावा त्यात गायी, म्हशी, शेळी पालन, कुक्कुट पालन आदी जोडधंदे करावेत शेतीत उत्पन्न न आल्यास जोडधंदा उत्पन्न देते आणि दोन तीन भाऊ असंतील तर एकाने शेती, दुसऱयाने धंदा, तिसऱ्यांने शिक्षण करावे शेतीतच सर्व भाऊ आले तर ते परवडत नाही, मुला,मुलीना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकविण्यासाठी गावकऱ्यांना आवाहन केले.
गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुर्वे यांनी गावविकासासोबत गावातील शाळेचाही विकास साधावा जेणे करून शासनाने दिलेला 16 कलमी कार्यक्रम आपल्या ग्रामस्थाच्यावतीने पूर्ण करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार अनिल चौधरी यांनी मानले.