रावेरमध्ये रक्षा खडसेंविरोधात ‘वंचित’चे संजय ब्राह्मणे
जळगाव (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून इंजिनिअर संजय ब्राम्हणे यांना उमेदवारी दिली आहे. मागील वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कांडेलकर यांना ८७ हजार मते मिळाली होती.
संजय ब्राम्हणे यांनी यापूर्वी भुसावळ राखीव विधान सभा निवडणुक लढविली होती. त्यामुळे त्यांना रावेर मतदार संघाचा बऱ्यापैकी अभ्यास आहेचं. त्याच बरोबर वंचित आघाडीच्या नेत्या शमिभा पाटील या देखील रावेर लोकसभा विभागाच्या जिल्हाध्यक्ष असून त्यांची या मतदार संघात चांगली पकड आहे. त्यामुळे त्यांना लाखो मते मिळणे शक्य होणार आहे.
संजय ब्राम्हणे यांची आता भाजपचे रक्षा खडसे यांच्याशी लढत होणार आहे.
हिंगोली – डॉ. बी. डी. चव्हाण, लातूर -नरसिंहराव उदगीकर, सोलापूर -राहुल गायकवाड, माढा -रमेश बारसकर, सातारा – मारुती जानकर, धुळे – अब्दुल रहेमान, हातकणंगले – दादासाहेब चवगोंडा पाटील, रावेर – संजय ब्राम्हणे, जालना – प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य – अबुल हसन खान, रत्नागिरी -सिंधुदुर्ग – काका जोशी असे उमेदवार जाहीर झाले आहे.