यावल तालुक्यातील भालोद येथील घटना, जखमींवर उपचार सुरू
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील भालोद गावाजवळ मजुरांनी भरलेली एक पिकप व्हॅन अचानक पलटी झाल्यामुळे त्यातील १८ जण जखमी झाल्याची घटना शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान जखमींवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यावल तालुक्यातील हिंगोणा येथून काही मजूर हे भालोद येथे हरभरा कापणीसाठी जात होते. त्यावेळेला भालोद गावाच्या पुढे अचानक पिकप व्हॅन पलटी झाल्यामुळे त्यातील १८ जण गंभीर जखमी झाले. (केसीएन)जखमींना शासकीय रुग्णवाहिकेमधून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत मजुरांचा समावेश आहे.
शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, सीएमओ डॉ. स्नेहल दुगड, डॉ.निखिल तायडे, शल्यचिकित्सा विभागाचेडॉ.रोहन पाटील,डॉ.अमोल पाटील डॉ. निलेश पाटील, डॉ. जिया उल हक, डॉ. किरण सोंडगे यांच्या वैद्यकीय पथकातील डॉक्टरांनी जखमींवर तात्काळ उपचार सुरू केले आहे. (केसीएन)यात गोदीबाई बारेला हिला जबर मार लागल्याने ऍडमिट करण्यात आले आहे. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
जखमी रुग्णांची नावे
शारदा मुंगीलाल बारेला (वय १०), दिपाली जगदीश बारेला (वय ८), मंगू जगदीश बारेला (वय २०), प्रमिला सयाराम बारेला (वय २१), आनंद सखाराम बारेला (५ महिने), उमेश जगदीश बारेला (वय १२ वर्ष),(केसीएन)सखाराम गुजरिया बारीला (वय २०), ममता मांगीलाल बारेला ( वय १२), संदीप मांगीलाल बारेला (वय ६), राणू मांगीलाल बारेला (वय ४), दिलीप बारेला (वय १८ वर्ष), कविता तापा बारेला ( वय ५ वर्ष), गोदीबाई बारेला (वय ४२ वर्षे), सविता बारेला (वय ४६ वर्ष) नीरसा मांगीलाल बारीला (वय ३० वर्ष), दिनेश वैद्या बारेला (वय १२) जगदीश बारेला (वय २५).