भारतरत्न सरदार पटेल जयंती उत्सव समितीतर्फे कार्यक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- भारताचे प्रथम गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीमधील सरदार पटेल यांच्या पुतळ्याला आ. राजूमामा भोळे यांनी मध्यरात्री पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती.
भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती जळगावच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिकेच्या इमारतीखाली सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रशस्त पुतळा उभारण्यात आला आहे. दि. ३१ ऑक्टोबर रोजी जयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास आ. राजूमामा भोळे यांनी पुष्पहार अर्पण करून पुतळ्याला वंदन केले.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य अतुलनीय असून देशाच्या हितासाठी त्यांनी काम केले. लोहपुरुष सरदार पटेल यांचे कार्य व विचारांपासून समाज बांधवांनी प्रेरणा घेत मार्गक्रमण करीत राहिले पाहिजे असे आमदार भोळे म्हणाले.
यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, डॉ. वीरेन खडके, डॉ. वैभव पाटील, कुंदन काळे, अजित राणे, सुनील महाजन, पियुष कोल्हे, चंदन कोल्हे, शंतनु नारखेडे, मिलिंद चौधरी, ललित चौधरी, महेश चौधरी यांच्यासह समाज बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.