जळगाव ( प्रतिनिधी ) – सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या तरुणांसाठी शिवराज्याभिषेक रिल बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यातील कलेतून शिवरायांना मानवंदना देण्याची संधी प्राप्त झाली आहे.
स्पर्धेसाठी २५ हजार रुपये प्रथम बक्षीस, २० हजार द्वितीय व १५ हजार तृतीय बक्षीस असेल. शिवाय, ५ हजारांची ८ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. शिवराज्याभिषेक हा विषय घेऊन आपला व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. व्हिडीओ याआधी अपलोड केलेला नसावा, तो पूर्णत: नवा असावा. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ असून मो.क्र. 7028010560 यावर संपर्क करावा.