भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
भंडारा (प्रतिनिधी) :- दुचाकीने प्रवास करीत असताना मुख्याध्यापकाच्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा स्फोट झाला. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा सहकारी जखमी झाला. ही धक्कादायक घटना साकोली तालुक्यातील सिरेगावबांध या गावात शुक्रवारी रात्री घडली.
सुरेश संग्रामे असे मृत शिक्षकाचे, तर नत्थू गायकवाड असे जखमीचे नाव आहे. सुरेश संग्रामे हे कुरखेडा तालुक्यातील कसारी जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. ते आणि गायकवाड एका कार्यक्रमासाठी जात असताना अचानक संग्रामे यांच्या खिशातल्या मोबाइलचा स्फोट होऊन कपड्याला आग लागली. त्या आगीत भाजल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेले नत्थू गायकवाड हे गाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले.