• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाघ, बिबट्या, अस्वलं, निलगाय, घुबड….बौद्धपौर्णिमेला वन्यप्राण्यांचे दर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
वाघ, बिबट्या, अस्वलं, निलगाय, घुबड….बौद्धपौर्णिमेला वन्यप्राण्यांचे दर्शन

यावल वनपरिक्षेत्रात प्रगणनेत अधिकाऱ्यांसह नागरिकांनी लुटला प्राणी-पक्षी बघण्याचा आनंद

जळगाव (प्रतिनिधी) : यावल वनविभागातील सात वनपरिक्षेत्रापैकी रावेरमध्ये सर्वाधिक प्राण्यांची नोंद झाली आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट्यासह वन्यप्राण्यांचे दर्शन वन्यप्रेमींना झाले. त्यासाठी चोपडा वनक्षेत्रात ३, वैजापूरला ७, अडावद ४, देवझिरी ४, यावल पूर्वमध्ये ७, पश्चिममध्ये ६ तर रावेर वनक्षेत्रात १२ अशा ४२ मचाण उभारण्यात आल्या होत्या. बुध्द पौर्णिमेला सायंकाळी ५ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली.

यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पर्यटकांना वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्याचा आनंद घेण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

यात वाघ आणि बिबट्यांसह, अस्वल, कोल्हा, तडस, निलगाय, चिकारा, चितळ, भेकर, सायाळ, रानडुक्कर, माकड, मोर, घुबड, सर्पगरुड, रातवा, कापशी घार, धामणसाप, घोणस, मन्यार, रानमांजर, ससा, मोर आदी वन्यप्राणी पर्यटकांना समोरून बघता आले. चिंचाटी धरणावरील अंजन मचानीवर असलेले वन्यजीवप्रेमी अर्जुन ठाकुर, वनरक्षक राजु बोंडल यांना वाघाचे दर्शन झाले. रावेर वनक्षेत्रातील गारबर्डी, लोहारा, कुसुंबा या सफारी क्षेत्रात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहे.

त्यामुळे गेल्या दोन वर्षात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. या मोहिमेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेच्या डीआरएम इति पांडे, फैजपूरच्या प्रांताधिकारी तथा परिविक्षाधीन जिल्हाधिकारी देवयानी यादव यांच्यासह अनेक अधिकारी तथा व पर्यटकांनी यात सहभाग घेतला होता.

यावल वन विभागात गेल्या दोन वर्षापासुन सातपुडा परिसरात वन्यप्राण्यांकरीता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे सातपुडा परिसरात जैविक विविधता निर्माण झालेली आहे व वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

वनक्षेत्रनिहाय प्राण्यांची नोंद
चोपडा: २७
वैजापूर :५८
अडावद : २२
देवझिरी : ३४
यावल पूर्व: ७८
यावल पश्चिम : ६४
रावेर : ३०१
एकूण : ५८४


 

 

Previous Post

धारदार शस्त्र घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल : पोलिसांनी चौघांना केली अटक

Next Post

“सौरभ ज्वेलर्स” दरोडेप्रकरणी सूत्रधारासह तिघांना अटक, दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात सशस्त्र दरोडा, ६ जण सीसीटीव्हीत कैद

"सौरभ ज्वेलर्स" दरोडेप्रकरणी सूत्रधारासह तिघांना अटक, दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

“मुलगा मानलेल्या” बहिणीच्या मुलाचा घातक कट!

September 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon