वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – वडती येथील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज देशभर साजरी केली जात आहे.
महात्मा गांधी यांच्या व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. त्या प्रमाणे येथील माध्यमिक शाळेत देखील महानायकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.
पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडती येथे २ ऑक्टोबर रोजी अहींसेचे जनक महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक संजय जोशी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सेवा जेष्ठ शिक्षक अतुल चव्हाण यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण केले. कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क लावून सोशल डिस्टंसींगचे पालन करून कार्यक्रम साजरा केला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली.







