चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बहाळ, टेकवाडे, रहिपुरी, वडगाव लांबे परिसरात वादळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत आज आ. मंगेश चव्हाण यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य समजतो. नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही यावेळी शेतकऱ्यांना दिली. दरम्यान नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले असून शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.