लखनौ ( वृत्तसंस्था ) – उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात 17 वर्षीय तरुणीवर वडिलांसह 28 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये पीडितेने समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या काही नेत्यांचीही नावे घेतली आहेत.
तक्रारीमध्ये तरुणीने आरोप केला की, 6 वीत शिकत असताना वडिलांनी तिला अश्लील व्हिडिओ दाखवून शारीरिक संबंध ठेवले कुणालाही सांगितलं तर आईला ठार मारण्याची धमकी दिली. काही दिवसाननंतर नराधम बापाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेच्या स्वाधीन केलं. त्या महिलेन तिला एका हॉटेलमध्ये नेल आणि तिथेही अज्ञातांकडून बलात्कार झाला.
पुढचे अनेक महिने नवीन पुरुषांकडून तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी अमानुष पद्धतीने बलात्कार करण्यात आला. या सर्व नराधमांमध्ये तरुणीच्या वडिलांसोबत काही नातेवाईक आणि राजकीय नेत्यांचाही समावेश होता. नकार दिल्यास तरुणीला आईला जीवे मारण्याची धमकी दिली जायची. या धक्कादायक प्रकारामध्ये तिची आजीदेखील आरोपींना मदत करायची.
इतक्या दिवसाच्या अत्याचारानंतर तरुणीने हिम्मत करुन पोलिसांकडे तक्रार केली. एसपी निखिल पाठक म्हणाले, ‘ही अत्यंत धक्कादायक घटना आहे आणि आम्ही गांभीर्याने तपास करत आहोत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात पीडितेची साक्ष नोंदवली जाईल
तरुणीच्या तक्रारीच्या आधारे ललितपूर पोलिसांनी मुलीचे वडील, सपाचे जिल्हाध्यक्ष, सपाचे शहराध्यक्ष, बसपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेकांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्याविरोधात कलम 354, 376-डी, 323, 506 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 5/6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.