मुंबई (वृत्तसंस्था ) ;- येस बँक गैरव्यवहारप्रकरणी वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. कपिल आणि धीरज वाधवान यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. येस बँकेत कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी गैरव्यवहार केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांनी महाबळेश्वरला केलेल्या प्रकरामुळे देखील त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
या प्रक्रियेत सातारा पोलिसांनी मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात आवश्यक असलेले सर्व नियम पाळले जात आहेत. एवढंच नव्हे तर १+३ असा प्रवास करणार असल्याचं देखील गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.