जळगावच्या आयुष्याचा ॠणानुबंध वधुवर केंद्रचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – सध्या देशात लोकशाहीचा उत्सव सूरू आहे. लोकसभा निवडणूकीत पुढील दोन टप्प्यात मतदान होणार असून गु्रप सदस्यांना मतदान अवश्य करण्याबाबत आपल्या गु्रप सदस्यांनी कुटुंबातील सर्वाचें मतदान होईल यांची काळजी घ्यावी. माझी सर्व सदस्यांना नम्र विनंती की कारण न देता मतदाना जरूर जावे व आपला सेल्फी मला नक्की पाठवावा वारंवार हा संदेश देवून जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे.
जळगावच्या राहूल कुळकर्णी यांनी आयुष्याचा ॠणानुबंध वधुवर केंद्र व्हॉटसअप गु्रप गेल्या तिन वर्षापासून ब्राम्हण समाजासाठी मोफत सूरू केला असून आज दोन गु्रप कार्यरत असून १६०० च्यावर सदस्य गुजरात,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून जोडले आहे. दोन टप्प्यात अतिशय कमी मतदान झाले होते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वौतपरी प्रयत्न सूरू आहे. गेल्या तिन वर्षात कुठलाही मोबदला न घेता समाजसेवी उपक्रमांना हातभार लावण्यासाठी आवाहन केल्यानंतर प्रतिसाद मिळवणाच याची खात्री असल्याने गु्रप सदस्यांना मतदान करा व सेल्फी गु्रपवर पाठवा असे आवाहन वारंवार केले जात असल्याने निश्चीतच फायदा होवू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यापुर्वी देखिल अनेक समाजपयोगी उपक्रमांना मोफत काम करत असल्याने सदस्यांनी प्रतिसाद दिला असून पहिल्या तिन टप्यात अनेक सदस्यांनी मतदान केले व सेल्फी गु्रप टाकले आहे. हीच कल्पना त्यांनी इतरही वधुवर ग्रुपवर राबवत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे व या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत आहे.