जळगाव (प्रतिनिधी) – सुन्नी मुस्लिम बांधवांचे धर्मगुरू, सुन्नी मुस्लिमांचे राष्ट्रीय मरकज ( मुख्य धार्मिक केंद्र) बरेली शरीफ उत्तर प्रदेश येथील आला हजरत, अझिमुल बरकत, मुज्जदिदो दिनो मिल्लत, इमाम – ए – इश्क मोहब्बत, इमाम अहेमद रझा खा रझी यांच्या १०२ व्या उर्स मुबारक निमित्त आज भिलपुरा नियामतपुरा भागात सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमांत शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे व सै. अयाज अली नियाज अली यांच्या हस्ते वड, पिंपळ यांची रोपटे लावण्यात आलेत . याप्रसंगी विठ्ठल ससे व सै. अयाज अली नियाज अली यांनी वृक्षारोपण व निसर्गाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी शफि ठेकेदार, हाजी शेख आरिफ, हाजी नईम शेख, हाजी निसार खाटीक, हाजी इकबाल शेख, नूर मोहम्मद शेख, मनोज सेठीया, बप्पी पाकिरा, दिनेश लखारा, हाजी शेख इकबाल, मोईनुद्दीन अली, दानिश शेख, नाझीम कुरेशी, सलमान जाफर, सय्यद शकील, मोहम्मद खान, शेख जलालुद्दीन, शाकिब फारुख, सय्यद ओवेश अली आदी उपस्थित होते.