जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पळासखेडे (मिराचे) येथील नि.पं. पाटील विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक राजेंद्र पितांबर पाटील यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम, कोरोना काळात केलेली शैक्षणिक सेवा व विविध उपक्रमात विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना धुळे येथे देण्यात आला आहे.
नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल सिताराम पाटील यांच्या हस्ते धुळे येथे पुरस्काराचे वितरण झाले. नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमने त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केला. दि. ०१ ऑक्टोबर रविवार रोजी या कार्यक्रमाला कर्नल गणपती श्रीनिवासन, आमदार कुणाल पाटील, शिवाजी अकलाडे, प्रमोद पाटील हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. अशोक पाटील व भास्कर पाटील हे कार्यक्रमाचे आयोजक होते.
उपशिक्षक राजेंद्र पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष संजयराव गरूड, सचिव सतिषचंद्र काशिद, सहसचिव दीपक गरूड, वसतिगृह सचिव कैलास देशमुख, मुख्याध्यापक बी.एस.निकम, पर्यवेक्षक व्ही.आर. पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.