एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उत्राण येथे निलॉन्स कंपनीसमोर उपोषणाला बसलेल्या व्यक्तींनी उपोषणात लहान शालेय मुलांचा वापर केला तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत भिकन पाटील, भिकन रमेश कोळी, लताबाई रमेश कोळी, वाल्मिक ठाकरे आणि ज्ञानेश्वर महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील निलॉन्स कंपनी समोर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले उपोषणार्थी बसले होते. त्यांनी उपोषणकर्त्यांची संख्या वाढावी या उद्देशाने संगनमताने शालेय मुला मुलींचा वापर केला. बालहक्क व संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. पो.कॉ. स्वप्नील परदेशी यांनी याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. सहायक फौजदर रविंद्र पाटील पुढील तपास करत आहेत.