जळगाव् (प्रतिनिधी ) – अजिंठा चौफुली येथे बेवारस स्थितीत आढळून आलेल्या प्रौढाचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अजिंठा चौफुली येथे ४५ वर्षीय प्रौढ हा सोमवारी अत्यवस्थ अवस्थेत आढळून आल्यावर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्याचा उपचार सुरू दिल्या आहेत. असताना मृत्यू झाला. अद्याप मृताची ओळख पटलेली नसून त्याची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पीएसआय नीलेश गोसावी करीत आहे.