जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या सातव्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत ९४ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षा सुरु होत्या.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा दि. १२ ऑक्टोबर पासून सुरू झाल्या आहेत. रविवारी परीक्षेचा सातवा दिवस होता. आज विविध विद्याशाखांच्या १३२ विषयांच्या परीक्षा होत्या. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या परीक्षांच्या विविध सत्रात १० हजार ९४३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे दिली तर या सत्रात १३०० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षा सुरु होती. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली.