जळगाव (प्रतिनिधी) :- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील तीन कर्मचाऱ्यांनी ३० नोव्हेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्ती घेतली. यात सामान्य प्रशासन, विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहायक कुलसचिव शरद पाटील, विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्थेचे वरिष्ठ सहायक लतीब तडवी आणि विद्यार्थी विकास विभागातील लघुलेखक जगदीश शिवदे यांचा समावेश आहे.
सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित निरोप समारंभात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्र. संचालक प्रा. व्ही.एम. रोकडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सत्कारार्थी कर्मचारी सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी कर्मचारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना आणि उमवि पतपेढी यांच्या वतीनेही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना स्नेहपूर्ण गौरव करण्यात आला.









