कार्यकर्त्यांनी केले महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाकोद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांनी प्रचार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
राज्यभरामध्ये २०१९ नंतर अडीच वर्षाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व महाविकास आघाडीच्या विविध घटकांच्या सरकारने स्तुत्य निर्णय घेऊन विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न केला. कोरोना महामारीच्या काळात चांगले काम केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार लोकप्रिय झाले. त्यामुळे पुढील पंचवार्षिक काळात राज्यासाठी आता महाविकास आघाडी उत्तम पर्याय असल्याचे दिलीप खोडपे सर यांनी सांगितले. प्रचार दौऱ्यात शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष दीपकसिंग राजपूत,विश्वजीत मनोहर पाटील, म्हसास चे माजी सरपंच धनराज पाटील, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर पोपट पाटील,अशोक तुळशीराम पाटील,सामाजिक कार्यकर्ते श्रावण वायरमन, विकास सोसायटी चे माजी चेरमन अमृत पाटील, भीमराव पाटील, ग्रा.प. सदस्य कैलास पाटील,अशोक पाटील, संदीप पाटील,लाख तांडा येथील महारू राठोड, भाकचंद पोलीस पाटील, रामेश्र्वर तांडा येथील भीमराव पवार,गोकुळ राठोड, बळीराम जाधव आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


