जिल्ह्यातील १३ हजार समूहांना ३४० कोटींचे वाटप
जळगाव (प्रतिनिधी) : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष कॅम्प अंतर्गत प्रथम दिवशी २० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण ३० हजार स्वयंसहाय्यता समूह आहेत. या स्वयंसहाय्यता समूहांमध्ये ३ लक्ष एवढ्या महिला आहेत.
जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी असलेल्या उद्दिष्टापैकी यावर्षी ३४० कोटी रुपये १३ हजार स्वयंसाहायता समूहांना कर्ज स्वरूपात दिलेले आहे. दि. २६ व २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला बचत गटांसाठी विशेष कॅम स्वरूपात कर्जवाटप पीएमईजीपी योजना संदर्भात तथा पीएमएफएमई योजना संदर्भात विशेष कॅम्प बँक स्तरावर आयोजित करण्याचे सूचित केले होते. जिल्हाधिकारी यांनी सूचित केल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील जवळपास २२० शाखांमध्ये कर्ज वाटप कॅम्प सुरू करण्यात आले आहे.
सदरील कॅम्प साठी जिल्ह्यातील उमेद अभियानातील केडर तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी यांच्या मदतीने तीन दिवसीय कॅम्पमध्ये प्रथम दिवसात २० कोटी रुपयाचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे व हक्क दर्शक या संस्थेमार्फत ३३० प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे उर्वरित आज रोजी जिल्ह्याभरातील २२६ महिला बचत गटांना २२. ५० कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आलेले आहे सदरील नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुका टीम काम करीत आहे. तरी संपूर्ण जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उमेद अभियानातील केडर व कर्मचारी व सर्व बॅक शाखा व्यवस्थापक यांच्या सहकार्याने आज समुहांना कर्ज वितरण करण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आलेले होते.