जळगाव (प्रतिनिधी ) – प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव व शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली गेली ८ वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे.
यात स्व.डॉ.कडूसकर यांच्यातर्फे ओम ओम अॅवार्ड एमबीबीएस शेवटच्या वर्षाच्या निकालानंतर सर्वोत्कृष्ठ ठरलेले विद्यार्थी मुलींमधून डुंबरे कावेरी शिवाजी, मुलांमध्ये असीम हयाचंद तर तृतीय पारितोषिक स्व.वासुदेवराव पाटील यांच्या नावाने डॉ.उल्हास पाटील यांनी जाहिर केलेले असून राजपाल भारती भगवान हिने हे बक्षीस पटकाविले.
डॉ.आर्वीकर यांनी जाहिर केलेले एक्सलन्स अवार्ड एमबीबीएस तृतीय पार्ट वनला उत्तीर्ण झालेले सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी मुलींमध्ये पंड्या प्रियंका तर मुलांमध्ये चौरसिया सनी यांना मिळाले. स्व.वासुदेवराव पाटील यांच्या नावाचे पारितोषिक समृद्धी पठारे हिला प्रदान केले.
द्वितीय वर्षात मायक्रोबायोलॉजी या विषयातील सर्वोत्कृष्ठ विद्यार्थ्यांसाठी पुरस्कार प्रिया बालाणी व स्पेंटा शिल्पा या दोघींना विभागून मिळाले. सर्व पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व ५ हजार रुपये रोख असे आहे. सायंकाळच्या गणेश आरतीनंतर अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्वीकर, प्रा.डॉ.माया आर्वीकर, प्रा.डॉ.दिपक अग्रवाल, प्रा.डॉ.अनुश्री अग्रवाल यांच्याहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.