जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लुपिन डायग्नोस्टिक्स लॅबचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दि. २६जानेवारी रोजी करण्यात आले. रुग्णांना आपल्या उपचारासाठी कुठलीही दिरंगाई होऊ नये व त्यांना आपल्या विविध वैद्यकीय चाचण्या शहरातच उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने या लॅबची शहरात उभारणी झाली.
अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लॅबचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित कापून उद्घाटन केले. अशोक जैन यांनी लॅबच्या कार्याबाबत व तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती जाणून घेतली. अशोक जैन यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, तुमच्या प्रयत्नांमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्राला नक्कीच गती मिळेल, आणि अनेकांना त्याचा लाभ होईल. रुग्णांचा व डॉक्टरांचा यामुळे मौल्यवान वेळ वाचेल. आणि अनेकांना योग्यवेळी योग्य तो उपचार मिळेल. डॉ. रेणुका इथापे, योगेश परजणे, सागर शेलार, तन्वीर पटेल, विजय बोरणारे, केतन सोनवणे, प्रेम सोनार आदी. उपस्थित होते.