सहभागासाठी धरणगाव तालुक्यातील नागरिकांना सीईओंचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- वर्षानुवर्ष साचलेल्या त्याच त्या तक्रारी तसेच जिल्हा परिषदेची संबंधित असलेल्या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयांना नागरिक व कर्मचारी यांना वारंवार माराव्या लागणाऱ्या फेऱ्या यापासून आता संबंधित कार्यालय व नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोन वेळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे.
यातून सर्व प्रकारच्या तक्रारीचे जागच्या जागी निराकरण करण्यात येणार आहे. या अभिनव योजनेमुळे एक प्रकारे प्रशासन आपल्या दारी याचा प्रत्यय नागरिकांना येणार आहे. याअंतर्गत बुधवार दिनांक २१ मे रोजी धरणगाव पंचायत समिती येथे तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे.या तक्रार निवारण दिनास जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत.या बाबत धरणगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी बुधवार दिनांक २१ मे रोजी धरणगावं पंचायत समिती येथे उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.