पाचोऱ्यात उद्योजकता विकास एकदिवसीय सेमिनारचे आयोजन
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील एम. एम. महाविद्यालय येथे वाणिज्य विभागामार्फत वाणिज्य मंडळाचे अंतर्गत उद्योजकता विकास या एकदिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. व्ही.पाटील हे होते.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आर. डी. वाघ हे होते. प्रा. जे. डी.गोपाळ, प्रा. डॉ एस. बी.तडवी, डॉ.कमलाकर इंगळे, डॉ. शरद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. आर. डी. वाघ, जामनेर महाविद्यालय यांनी उद्योजक या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योजक कसे निर्माण होतील? तसेच स्टार्ट अप व सेवा क्षेत्रात संधी या दृष्टीने विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांनी उद्योजकतेचे महत्त्व, विद्यार्थी कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले.
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही उद्योजकतेकडे वळा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डॉ. योगेश बी. पुरी यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. सरोज अग्रवाल यांनी केले. आभार प्रा. किरण पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. वळवी, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. शीतल महाजन, प्रा. लक्ष्मी गलानी, जावेद देशमुख व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.