जळगावात नागरिकांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील प्रसिद्ध अग्रवाल चौकात असणाऱ्या उड्डाणपुलावरील एक पथदिव्याचा खांब नाजूक अवस्थेत उभा आहे. तो खाली पडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना धोकादायक ठरू शकतो आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व महानगरपालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
उड्डाणपुलावर रात्रीसाठी सर्वत्र पथदिव्यांचे खांब उभारण्यात आले. मात्र या खांबांची उभारणी सदोष पद्धतीने दिसून येत आहे. त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा विद्युत खांब खाली पडून एखाद्या वाहनधारकाचा जीव घेऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.