जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील एचपी पेट्रोल पंपाच्या जवळ लावलेला चार लाख ७५ हजार रुपये किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्याने लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती वरून, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेले शफकत अली साजिद अली ( वय – ३०) यांचा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक (एम एच १९ झेड ३३०७) हा एचपी पेट्रोल पंपा समोर असलेल्या महामार्गाच्या रस्त्यालगत ५ जून ते ६ जून दरम्यान लावला होता . मात्र सकाळी आठ वाजेच्या सुमारास शफकत अली साजिद अली यांना रस्त्याच्या कडेला ट्रक दिसून न आल्याने त्याचा शोध घेतला असता तो न मिळून आल्याने त्यांनी एक महिन्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनला ५ जुलै रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . याबाबत पोलीस नाईक इमरान सय्यद तपास करीत आहे.