जळगाव ते भुसावळ रोडवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) ;- राष्ट्रीय महामार्गावर चालत्या मोठ्या ट्रकच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागल्याची घटना जळगाव ते भुसावळ रोडवरील टाटा शोरूमजवळील वैष्णवी फटाके गोडावून समोर बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप आलेले नाही
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव ते भुसावळ रोडवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ गेलेले आहे. यावेळी भुसावळ कडून जळगावकडे जात असलेला मोठा ट्रकच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागली. ही आग लागताच चालकाने तातडीने ट्रक जागेवरच थांबविला व ट्रकमधून बाहेर पडला ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर आली नाही .