जळगावात महामार्गावर पाळधीजवळ दुर्घटना
जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर सावदा वळण रस्त्यावर ट्रालाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोनगाव येथील प्रौढ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पाळधी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळधी येथील महामार्गावरील सावदा वळण रस्त्यावर सुरतहून कोलकाता येथे जाणारा ट्राला (एचआर- ५५, एएक्स ७७४६) ने जळगावहून पाळधीकडे येणाऱ्या दुचाकी (एमएच- १९, सीए – १९६२) ला दिलेल्या धडकेत दुचाकी चालक तथा दोनगाव येथील सुधाकर नथ्थू पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी जळगावच्या जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुधाकर पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर वाहनांची रांग लागल्या होत्या. पाळधी पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पाळधी पोलीस चौकीत जमा करण्यात आले असून पाळधी पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.









