• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढली.मोठ्या रकमेसह पोलिसांच्या ताब्यात सापडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मोठ्या प्रमाणात स्वतःजवळ रोकड ठेवत एक्सप्रेसने प्रवास करणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. स्वतःजवळ एवढी मोठी रक्कम असतानाही त्याने एका तरुणीची छेड काढली. त्यानंतर मुलीने तक्रार केल्यावर रत्नेश कुमार नावाच्या प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ 58 लाख रुपयांची रोकड आढळल्याने पोलिसही चक्रावले. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम तो नेत होता काय, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

दिल्लीहून अलीपूर द्वारकडे जाणाऱ्या महानंदा एक्सप्रेसमधून 58 लाखांची रोकड सोबत घेत रत्नेश कुमार प्रवास करत होता. तो कटिहारला जात होता. एक्सप्रेस पाटणा जंक्शन स्थानकात थांबल्यावर रत्नेश कुमारने एसी कोचमध्ये बसलेल्या तरुणीची छेड काढली. त्या तरुणीने एक व्यक्ती आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार मदत केंद्रावर फोनद्वारे केली.

तरुणीच्या फोनची दखल घेत एक्सप्रेसमध्ये गस्त घालणारे आरपीएफचे जवान एसी कोचमध्ये दाखल झाले. त्यांनी रत्नेश कुमारला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी त्याला बख्तियारपूर स्थानकात उतरवण्यात आले. या स्थानकात त्याची आणि त्याच्या बॅगची झडती घेतली असता पोलिसही चक्रावले. रत्नेश कुमारकडे तब्ब्ल 58 लाखांची रोकड सापडली.

एवढी मोठी रोकड सापडल्यावर त्याची कसून चौकशी करण्यात आली. आपण प्रयागराजच्या महुआवा येथील असल्याचे त्याने सांगितले. आपण एक व्यापारी असून कच्चा माल खरेदी करण्यासाठी कटिहारला जात असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. चौकशीनंतर रत्नेशकुमारला पाटणा जंक्शन जीआरपीकडे सोपवण्यात आल्याचे आरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले.

रत्नेश कुमारकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने आयकर विभागालाही याची माहिती देण्यात आली आहे. आयकर विभागही त्याची चौकशी करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने रोकड कोठून आणली आणि ती कुठे नेत होता, याची विभाग चौकशी करत आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही रत्नेश कुमारची चौकशी करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी या पैशांचा वापर होणार होता काय, याचा शोध पोलीस घेत आहे.


 

 

Previous Post

चोपडा नगरपालिका वृक्षारोपण गैरव्‍यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी नेमली चौकशी समिती

Next Post

प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपीला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

February 20, 2026
शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

February 20, 2026
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon