वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प आणि पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. स्वतः ट्रम्प यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते.
दरम्यान डोनाल़्ड ट्रम्प यांनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की,’मला बरं वाटावं म्हणून वॉल्टर रिड मेडिकल सेंटरचे डॉक्टर्स, नर्सेस हे प्रचंड मेहनत घेत आहेत. लवकरच करोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन असं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे.
ते पुढे म्हणाले,’करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या सगळ्यांचं कार्य पाहून मी थक्क झालोय. मागील सहा महिन्यात ज्या ज्या रुग्णांनी करोनावर मात केली त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अमेरिका ही एक महासत्ता आहे. जगात अमेरिकेचा दबदबा आहे या अमेरिकेसाठी मी लवकरच करोनामुक्त होऊन परत येईन असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.’