जळगाव ( प्रतिनिधी ) – गॅस सिलिंडर्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या टाकीचे कुलूप तोडून १७ हजारांच्या डिझेलची चोरी औद्योगिक वसाहतीत झाली आहे.

ट्रक चालक पुरुषोत्तम सोळुंके ( रा – कोळ न्हावी , ता – यावल ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , त्यांची नेमणूक असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील स्वामीनाथ ट्रान्स्पोर्टची गॅस सिलिंडर्सची वाहतूक करणारी ट्रक ( क्र – एम एच १९ – सी वाय – ३९९९ ) त्यांनी डिझेल भरून जळगावच्या औद्योगिक वसाहतीतील २० सप्टेंबररोजी रात्री उभी केली होती २१ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी त्यांनी टायर्समधील हवा तपासली तेंव्हा त्यांना डिक्सएलच्या टाकीचे कुलूप तोडून अज्ञात लोकांनी १७ हजार ४६० रुपये किमतीचे १८० लिटर्स डिझेल चोरल्याचे लक्षात आले . दरम्यान ते दुसरी एक खेप टाकण्यासाठी बाहेरगावी गेलेले होते म्हणून फिर्याद दाखल करण्यास विलंब झाल्याचे त्यांनी या फिर्यादीत म्हटले आहे . त्यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुम्हा दाखल करण्यात आला आहे.







