मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू येथील घटना
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास पिंपरीनांदू शिवारात तापी नदीकाठी झाली. मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सलीम शाह करीम शाह (वय ३९ वर्षे) यांनी पोलिसात खबर दिली. या खबर मध्ये म्हटले आहे की, फिर्यादी व मयत तोहीत शाह इस्माईल शाह हा त्याचे परीवारासह पिंपरीनांदू येथे राहतो व मजुरीचे काम करतो. दिनांक २० ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजेचे सुमारास चुलत भाऊ तोहीत शाह इस्माईल शाह हा ट्रॅक्टरवर मजुरीचे कामाला नदीकाठी गेला. तेथे ट्रॅक्टरमध्ये रेती भरुन गावात ट्रॅक्टरचे ट्रॉलीत बसुन घरी येत होता.
दुपारी १२.१५ वाजेचे सुमारास ट्रक्टर पलटी झाल्याने फिर्यादीचा चुलत भाऊ तोहीत शाह इस्माईल शाह दाबला गेला. असे समजल्याने फिर्यादी पिंप्रीनांदु शिवारातील नदीच्या काठी असलेल्या मोहन विश्वनाथ कुंभार यांचे विट भट्ट्याचे बाजुला ट्रॅक्टर पलटी झालेल्या ठिकाणी जावुन पाहीले असता आयशर ट्रॅक्टर ४८५ असा नंबर न टाकलेला त्याचे मागे विना नंबर ट्रॉली अशा वर्णनाची ट्रॉलीमध्ये तोहीत शाह इस्माईल शाह (वय २१ वर्षे) रा. पिप्रीनांदु ता. मुक्ताईनगर हा दाबला गेला.
तेथे जमलेल्या लोकांचे मदतीने ट्रॉली सरळ करुन तोहीत शाह इस्माईल शाह यास बाहेर काढण्यात आले व रुग्णालयात आणले असता त्यात तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर अनिकेत संदीप इंगळे याचे पायाला मार लागुन त्याला गंभीर दुखापत झालेली होती. अनिकेत पुढील उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले आहे संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.हे.का. लीलाधर भोई हे करीत आहेत.









