• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रॅक्टरचोरी रोखताना झाला रखवालदाराचा खून : सालदारचे शालकाच्या साथीने हैवानी कृत्य !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 16, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
ट्रॅक्टरचोरी रोखताना झाला रखवालदाराचा खून : सालदारचे शालकाच्या साथीने हैवानी कृत्य !

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील घटना उघड 

एलसीबी पोलिसांची यशस्वी कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वावडदा शिवारातील शेतशिवारात रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर, रोटर हिटरची चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) पोलिसांनी यशस्वी तपास करीत याप्रकरणी त्याच शेतातील संशयित सालदारासह त्याच्या शालकाला अटक केली आहे. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज यावरून पोलिसांनी दोघांना मध्यप्रदेशातून जेरबंद केले आहे.  यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी तपासाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

बिलवाडी येथील रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात शेत आहे. अज्ञात चोरट्यांनी शेतामध्ये जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी केला होता. यामध्ये रखवाली करणाऱ्या पांडुरंग पंडित पाटील (वय ५२, रा. बिलवाडी) या रखवालदाराचा डोक्यात लोखंडी  वस्तू टाकून निर्घूण खून केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले होते.  तसेच, ट्रॅक्टर व रोटर हिटर चोरून नेले होते. याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात झाला होता.

अशी उघड झाली घटना

उपविभागीय अधिकारी  ऋषीकेश रावले यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत एलसीबीचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना आदेश दिले होते. त्यावरून किसन नजन पाटील यांनी एपीआय निलेश राजपूत, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदिप सावळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी अश्यांचे पथक तयार केले होते. पथकाने घटनास्थळी मिळालेले पुरावे, मोबाईल लोकेशन, गोपनीय माहिती तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मालक राजेंद्र पाटील, रा. बिलवाडी यांचे कडील सालदार पवन बहाधीर बारेला (वय ३०, रा. वाघाड जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याच्यावर संशय बळावला.

मध्यप्रदेशातून केली अटक

शेतमालकास विचारपुस करता मालकाने पवन बारेला हा त्याचे कुटुंब व शालकासह त्याचे सासरवाडी सालीकला (सालीतांडा ता.राजापुर जि.बडवानी, मप्र) येथे गेल्याचे समजले. पथकाने त्याच्या गावी जाऊन त्याला शोधले. पवन बारेला व त्याचे सोबत १ इसम मिळून आल्याने त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.  पवन बहाधीर बारेला (वय ३०, वाघाड ता.राजापूर जि.बडवणी) व वाघरसिंग शोभाराम बारेला (वय २४, रा. सालीफल (सालीतांडा) वा.राजापुर वडवणी म.प्र.) अशा दोघांना अटक करण्यात आली.

संशयित आरोपींनी असा केला खून

पवन बारेला याला वावडदा शिवारातील घटनेबाबत विचारले असता, त्याने घटनेची कबुली दिली. मी व माझा शालक अश्यांनी शेतमालकाचे ट्रॅक्टर चोरी करण्याचे ठरवले होते. मध्यप्रदेशातून बिलवाडी  येथे येवून मालकाचे खळयातून ट्रैक्टर चोरी करीत असतांना तिथे झोपलेला रखवालदार पांडुरंग पंडीत पाटील याने त्याला विरोध केला. त्यावेळी ट्रॅक्टरसाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तूने रखवालदार पांडुरंग पाटील याचे छातीत व डोक्यात मारुन त्याचा खून दोघांनी केला. तेथून ट्रॅक्टर घेवून निघून गेला. परंतु रस्त्यात ट्रॅक्टर बंद पडल्याने ते तिथेच सोडून  मोटार सायकलने पुन्हा सासरी सालीतांडा येथे निघून आले. त्यामुळे एलसीबीने दोघांना अटक करण्यात आली. संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tracktar-chori-rokhatanna/
Previous Post

भुसावळात व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण; एकावर गुन्हा दाखल

Next Post

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम

भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीत नवीन विक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon