अमळनेर(प्रतिनिधी) – धुळ्याकडून येणारा ट्रक व अमळनेर कडून जाणारी पीक अप व्हॅन आणि मोटरसायकलच्या तिहेरी अपघातात मामा भाचे हे दोघे जागीच ठार व अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना धुळे ते अमळनेर रस्त्यावर मंगरूळ व लोंढवे फाट्या दरम्यान मंगळवार दि. १० रोजी दुपारी हि घटना घडली.


धुळ्याकडून येणारा ट्रक (क्र एम एच 18 बी जी 4353) व जळगावहून चोपडाई कोंढावळ जाणारी पिकअप व्हॅन (क्र एम एच 41 जी 213 ) यांच्यामध्ये आणखी एक मोटरसायकल आल्याने दोघे वाहनाची समोरासमोर धडक झाली ही धडक इतक्या जबरदस्त होती की दोनही वाहनाच्या चालक असलेली केबिन पूर्णपणे दाबली गेली होती, त्यात पीक अप व्हॅन वरील योगेश सखाराम हालोरे (वय 23) आणि ज्ञानेश्वर देविदास पाटील (वय 26 ) हे दोघे चुलत मामा भाचे जागीच ठार झाले .
ट्रक चालक व मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले त्यांना अम्बुलन्सने धुळे येथे नेण्यात आले घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , हे कॉ सुभाष महाजन , भूषण पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला दोघे मयतांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.







