जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागपूर कारागृहात स्थानबद्ध
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील तुकाराम वाडी परिसरात राहणारा गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (वय २६) याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सचिन चौधरी याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे सचिन चौधरी याच्यावर ९ गुन्हे दाखल आहेत. ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत हा प्रस्ताव जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे तत्कालीन निरीक्षक राकेश माणगावकर यांनी तयार करून एलसीबीला दि. १६ जून रोजी सादर केला होता. त्याचे अवलोकन केल्यावर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता.(केसीएन)त्यानुसार सोमवार दि. ३० जून रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याला एमपीडीए कायदेअंतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख कालू, संदीप चव्हाण यांच्यासह जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, सपोनी संतोष चव्हाण, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे, विकास पोहेकर आदींनी केली आहे.