पाचोरा (प्रतिनीधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद जळगाव, क्रीडा भारती जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, आणि जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्रीडादिननिमित्त राष्ट्रीय दिन क्रीडा सप्ताहातील १९ वर्षा आतील मुले व मुली आणि १९ वर्षावरील पुरुष व महिला थ्री ऑन श्री बास्केटबॉल स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील बास्केटबॉल मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या.
१९ वर्षांवरील बास्केटबॉल स्पर्धेत पाचोरा बास्केटबॉल गृप विजेता तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ उपविजेता, युनिटी बास्केटबॉल क्लब पाचोरा तृतीय स्थानी विजयी झाले. प्रथम, द्वितीय, तृतीय विजेता संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, युवा क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण महासंघाचे सचिव प्रा. हरीश शेळके यांचे हस्ते सन्मान ट्रॉफी देण्यात आल्या. पाचोरा विजयी संघाच्या खेळाडूंना प्रशिक्षक आबा पाटील, विकास सूर्यवंशी, गिरीश पाटील, जावेद शेख, भावेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम पाचोरा बास्केटबॉल गृप व युनिटी बास्केटबॉल क्लब तृतीय स्थानी विजयी झाल्याबद्दल पाचोरा संघांचे क्रीडा क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.