जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय कामे करून दीड वर्षांपासून ठेकेदारांना देयके देण्यात आले नाही. दिवाळीच्या आत पैसे द्या अशी मागणी करीत आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली

ही मागणी पुर्ण न झाल्यास दिवाळीनंतर साखळी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला व मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात शासनाचे सर्व व्यवहार बंद होते. ठेकोदारांची देयके थांबविण्यात आली ठेकेदारांनी कोरोना काळातही निविदा कराराद्वारे कामे केली मात्र अद्याप शासनाकडून निधी देण्यात आलेला नाही. मार्च २०२१ मध्ये शासनाने तटपुंजी तरतूद करून प्रलंबित निधींपैकी १५ टक्के निधी दिला होता. त्यानंतर पाच महिन्यांनी ३० टक्के निधी प्राप्त झाला. करोडो रुपयांची देयके राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. ठेकेदारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.
मिळालेल्या निधीत ठेकेदारांचे बँकेचे व्याज हप्ते, कामगारांचे व मजुरांचे पगार, इंधन तसेच मेंटेनन्स आणि पुरवठादार देयके थकल्यामुळे अडचणीत सापडले शेकडो कोटीं रुपये थकल्यामुळे भविष्यात रस्ते, पूल, मोरी दुरुस्तीची कामे, बिल्डिंग बांधकाम नाईलाजाने बंद करावी लागणार असा इशारा देण्यात आलेला आहे.







